केडगाव : केडगावचा बालेकिल्ला पुन्हा परत मिळवुन आठ विरूध्द शुन्य करण्यासाठी माजी महापौर संदिप कोतकर यांच्या गटाकडुन मोर्चेबांधणी सुरू झाली आ...
केडगाव : केडगावचा बालेकिल्ला पुन्हा परत मिळवुन आठ विरूध्द शुन्य करण्यासाठी माजी महापौर संदिप कोतकर यांच्या गटाकडुन मोर्चेबांधणी सुरू झाली आहे, त्याचाच भाग म्हणुन केडगाव मधील घरोघरी जात मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका २०२५ मध्ये होणार आहेत. यात राज्यातील मुदत संपलेल्या बहुताशी महानगरपालिकांचा समावेश असुन अहिल्यानगर महापालिकेची निवडणुक २०२५ मध्ये होणार असल्याने त्याची पूर्वतयारी आता सुरू झाली आहे.
माजी महापौर संदिप कोतकर यांना मानणारा मोठा मतदार केडगावमध्ये आहे. मात्र त्यांच्या व्यक्तिगत तांत्रिक कारणामुळे कोतकर गटाने मागील निवडणुकीकडे पाठ फिरवली होती. यावेळी मात्र पुर्ण ताकदीने केडगावच्या मैदानात उतरण्यासाठी कोतकर गटाने तयारी सुरू केली आहे.केडगावमधील सर्व जागा जिंकण्याचे त्यांचे धोरण असले तरी आता पुर्वि सारखी राजकीय परिस्थिती नसल्याने केडगावमध्ये एकतर्फि बाजी मारण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. त्याचीच तयारी त्यांनी आतापासुन सुरू केली आहे . संदिप दादा कोतकर विचार मंचच्या माध्यमातुन सध्या केडगावमध्ये हाऊस टू हाऊस जाऊन मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे.केडगावमध्ये सध्या ३३ हजार मतदार व दोन प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक असे जुने सुत्र समोर ठेऊन आपल्या हक्काचे मतदार वाढवुन हे अभियान सुरू करण्यात आले आहे . संदिप कोतकर विचार मंचच्या वतीने हे अभियान सध्या केडगाव मध्ये सुरू आहे.

COMMENTS