केडगाव : अहिल्यानगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात माजी जि.प. सदस्य सचिन अरुणकका जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज...
केडगाव : अहिल्यानगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात माजी जि.प. सदस्य सचिन अरुणकका जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सादर केली .विशेष म्हणजे या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन आमदार संग्राम भैया जगताप उपस्थीत होते . यावेळी त्यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . आमदार जगताप म्हणाले की ,
मागील १२ वर्षांपासून राज्यभरात नावाजलेल्या अहिल्यानगर महाकरंडक या महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला माझे बंधू श्री. सचिनभाऊ जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. त्यांना असलेली कलाक्षेत्राची आवड, कलेवर असलेले त्यांचे प्रेम हे यावेळी दिसून आले. अहिल्यानगर महाकरंडक २०२५ ची थीम यावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्याची होती. त्याच निमित्ताने सादर झालेल्या शिवराज्याभिषेकाच्या सादरीकरणावेळी सचिनभाऊ यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेने रसिकप्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी एक भाऊ म्हणून अभिमान तर वाटलाच सोबतच मंचावर त्यांचा सत्कार करण्याचा योग देखील यावेळी जुळून आला. यावेळी मंचावर अहिल्यानगर महाकरंडकचे अध्यक्ष श्री. नरेंद्र फिरोदिया आणि संयोजक श्री. स्वप्नील मुनोत देखील उपस्थित होते

COMMENTS