केडगाव : अहिल्यानगर तालुक्यातील खडकी गावच्या आर्थिक विकासात आणखी भर पडणार असुन शनिवार दि. २५ पासून खडकी गावातील लोकांच्या हितासाठी तसेच भा...
केडगाव : अहिल्यानगर तालुक्यातील खडकी गावच्या आर्थिक विकासात आणखी भर पडणार असुन शनिवार दि. २५ पासून खडकी गावातील लोकांच्या हितासाठी तसेच भाजी बाजाराच्या सोयीसाठी गावात प्रथमच आठवडे बाजार हा नवीन उपक्रम सुरू होणार आहे. गावातील महिला सक्षमीकरणासाठी तसेच शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावा म्हणुन हा बाजार सुरू होणार आहे. कुटुंबातील महिला भगिनींना रोजच्या जीवनात पडणारा प्रश्न म्हणजे भाजीला काय करायचे? तसेच ही भाजी कशी उपलब्ध करायची? हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागच्या शनिवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी येथे झालेल्या आनंदी बाजार या संकल्पनेतून गावात सरपंच प्रवीण कोठुळे यांच्या पुढाकारातुन आठवडे बाजार सुरू होत आहे. दर शनिवारी हा आठवडे बाजार भरणार आहे. तरी सर्व व्यापारी, शेतकरी यांना आपला शेतीमाल विक्री व खरेदी साठी यावे असे आवाहन सरपंच कोठुळे यांनी केले आहे. यावेळी सुजाता कार्ले , प्रतिक शेळके, वैभव खेंगट, रविंद्र कुडुस, भाऊसाहेब काळे, राहुल लोडके, विकास कार्ले हे शेजारील गावातील सरपंच उपस्थीत राहणार आहेत.

COMMENTS