केडगाव - केडगाव येथील नेप्ती रोड (अर्चना हॉटेल) ते विश्वयन राजे नगर बायपास चौक, रोडने कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा मार्केटला जाणाऱ्या अव...
केडगाव - केडगाव येथील नेप्ती रोड (अर्चना हॉटेल) ते विश्वयन राजे नगर बायपास चौक, रोडने कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा मार्केटला जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालावी अशी मागणी केडगाव येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुनिता कोतकर यांनी वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , मी अहमदनगर महानगरपालिकेची नगरसेविका असून याभागात केडगाव- नेप्ती रोड लगत अनेक मोठ मोठी उपनगरे तयार झालेली आहेत. तेथील नागारिकांना येण्या जाण्याचा नेप्ती रोड हा एकमेव मार्ग आहे. तसेच नेप्ती कांदा मार्केट या मार्गावरच असल्याने मोठ मोठ्या अवजड वाहनांची वाहतूकही याच मार्गाने होते.
याभागामध्ये शाळा, खासगी क्लासेस असून या मार्गाने वयोवृध्द नागरिक फिरण्यासाठी जात असतात. अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे काम पुर्ण झाल्यामुळे आणि बायपासरोडचा टोलनाका चालु झाल्यामुळे टोल वाचविण्यासाठी या रोडने बाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अपघात होऊन दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. तरी आपण या रस्त्याने अवजड वाहनांची वाहतूक थांबवून त्यांना पर्यायी रस्त्याने वाहतूकीस सूचना कराव्यात व योग्य ती कार्यवाही करावी. तसे न झाल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कोतकर यांनी दिला.

COMMENTS