केडगाव : अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या केडगाव येथील श्री भैरवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे गुरूवार दि. २६ जून रोजी केडगाव वेसीतुन प्रस्थान होत आह...
केडगाव : अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या केडगाव येथील श्री भैरवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे गुरूवार दि. २६ जून रोजी केडगाव वेसीतुन प्रस्थान होत आहे. मागील वर्षी संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसाठी असणारी बैलजोडी यंदा केडगावच्या दिंडीत दिसणार आहेत. केडगाव मधील प्रगतशिल शेतकरी अंजाबापू सातपुते यांच्या मालकीची ही बैलजोडी आहे. यावर्षि दिंडीचे प्रस्थान झाल्यानंतर केडगाव रेणुका माता मंदिर परिसरात केडगावचे भाग्यविधाते भानुदास कोतकर व जिल्हा बँकेंच्या माजी संचालिका सुरेखा कोतकर यांची पेढेतुला होणार आहे. श्री क्षेत्र पंढरपुर येथे भैरवनाथ देवस्थान समितीच्या वतीने केडगाव वारकरी भवनची उभारणी करण्यात आली आहे . तेथेच दिंडीचा मुक्काम असणार आहे. काल्याचे किर्तन झाल्यानंतर तेथे महाप्रसाद वाटप होईल . या दिंडीत माजी महापौर संदिप कोतकर व माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर , उद्योजक सचिन कोतकर , रामदास महाराज क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे नियोजन करण्यात आले

COMMENTS