नगर तालुक्यातील १०५ सरपंचपदाच्या आरक्षणाचा उडणार बार ! आज जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आरक्षण सोडत केडगाव : अहिल्यानगर तालुक्यातील ...
नगर तालुक्यातील १०५ सरपंचपदाच्या आरक्षणाचा उडणार बार !
आज जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आरक्षण सोडत
केडगाव : अहिल्यानगर तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधित मुदत संपणाऱ्या १०५ ग्रामपंचायतिंच्या सरपंचपदाचे आरक्षण आज ( बुधवारी ) जाहिर होणार आहे अशी माहिती तहसिलदार संजय शिंदे यांनी दिली.
याबाबतच्या आदेशात म्हटले आहे की , अहिल्यानगर तालुक्यातील २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या काळात तालुक्यातील १०५ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी बुधवार दि. २३ जुलै रोजी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता व दुपारी १ वाजता अशा दोन टप्प्यात हि आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याने तालुक्यातील गावोगावच्या नेत्यांना याची ऊत्सुकता लागली आहे.

COMMENTS